उमरगा (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाचे औचित्य साधून उमरगा तालुक्यातील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 30 गणेशभक्तांनी रक्तदान केले. 

उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये  गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. रक्त संकलनासाठी उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढीच्या योगेश सोनकांबळे, संगीता चौधरी, अजय अक्कलकोटे, कौस्तुभ खैरावकर या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये 30 गणेशभक्तांनी रक्तदान केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी. एच. बेडदुर्गे, सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे, प्राचार्य महेश कदारे, प्रा.परीक्षित शिरूरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा.किरण पांचाळ, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.प्रिया धोंडगे, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता वडजे, लिंबराज जवळगे आदीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top