परंडा (प्रतिनिधी) - शहरातील सोमवार गल्ली येथील श्री.समर्थ तरूण गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 51 गणेश भक्तांनी  रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन जि. प. माजी सदस्य सिध्देश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मकरंद जोशी, डॉ.अब्बास मुजावर, पोलीस पाटील संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

रेडक्रॉस इंडीयन सोसायटी शाखा बार्शी संचलीत श्रीमानभाई शहा रक्तपेढी येथील कर्मचारी  सुधीर सुमंत व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी रक्तसंकलन केले. रक्तदात्यांना मंडळातर्फे व रक्तपेढीतर्फे प्रमाणपत्र, अल्पोहार वाटप करण्यात आला. यावेळी श्री समर्थ तरूण गणेश मंडळाचे पदाधिकारी बाळासाहेब वडतिले, आकाश काळे, निलेश पालके, प्रसाद शेळके, शरद डोरले, प्रसन्न वैद्य, औदुंबर यादव, आकिल आतार, गणेश क्षिरसागर, रविकिरण वैद्य, पृथ्वीराज कदम, ओंकार वैद्य, गौरव काळे, प्रथमेश पालके, जयेश विद्वत, गणेश कुंभार आदिनी शिबीर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.


 
Top