वाशी (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्त तहसील कार्यालय, वाशी येथे महसूल प्रशासनाचे तसेच विश्व जन आरोग्य सेवा समिती, महाराष्ट राज्य यांचे वतीने रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, नागरिक असे एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे.
सदर कार्यक्रमास प्रवीण पाटील, उपविभागीय अधिकारी, कळंब, नरसिंग जाधव, तहसीलदार वाशी, नामदेव राजगुरु, गट विकास अधिकारी, पंचायत समिती वाशी, श्री.सचिन पाटील, प्र.नायब तहसीलदार, सोमनाथ कोकाटे, जिल्हा समन्वयक, विश्व जन आरोग्य सेवा समिती, जिल्हा उस्मानाबाद व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रक्त संकलन भगवंत ब्लड बँक बार्शी जिल्हा सोलापूर यांनी केलेले आहे.