धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी.औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये डॉ.प्रताप सिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली Empowering students for pharma competitive exam and development of soft skills  अंतर्गत जी.पॅट 2023- 24 या परीक्षेकरिता राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन वेबिनार संपन्न झाला.

या वेबिनारमध्ये मार्गदर्शक म्हणून  जी.पॅट डिस्कशन सेंटर प्रायव्हेटचे संचालक डॉ.अभिषेक त्रिपाठी यांनी मोलाचे  मार्गदर्शन केले.

तसेच जी.पॅट परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास कसा करावा, अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारे घटक, कोणत्या घटकाला किती प्राधान्य द्यावे, कोणत्या घटकावरती किती व कसे प्रश्न विचारले जातात अशा सर्व विषयावर सविस्तर चर्चा केली. याचबरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी समर्पक अशी उत्तरे देऊन विद्यार्थ्याचं शंकाचे निरसन केले.

सदरील कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून निशिनंदन शिंदे व सुप्रिया लोंढे यांनी जबाबदारी पार पाडली. सदरील कार्यक्रमास राष्ट्रीय स्तरावर 860 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.


 
Top