तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील रुद्र सिटीत ऐका महिलेने अडुतीस तोळे सोन्याचे दागिने दोघांना  दिले असता ते परत न केल्या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात विश्वासघात फसवणूक गुन्हा दाखल करण्यात आला.                          

या बाबतीत अधिक माहिती अशी की, अस्मिता दत्तात्रय शिंदे, वय 19  वर्षे, रा. नंदनवन कॉलनी, न्यु दत्त नगर, वाकड पुणे यांचे ओळखीचे अजय कैलास भोसले, रा. नेकनुर ता. जि. बीड,  अविनाश पवार, रा. पुणे यांचेवर विश्वास ठेवून अस्मिता शिंदे यांनी दि.05.09.2023 रोजी रुद्र सिटी तुळजापूर येथे वरील दोघांकडे  38 तोळे वजनाचे सुवर्ण दागिने अंदाजे  19,15,000 किंमतीचे दिले असता ते त्यांनी परत न करता अस्मिता शिंदे यांचा विश्वासघात करुन फसवणूक केली अशा फिर्यादी अस्मिता शिंदे यांनी दिल्याने  तुळजापुर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420, 406, 34  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top