धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील जनतेच्या सक्षम आरोग्यसेवेसाठी मोहिम आयुष्यमान भव अंतर्गत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून भूम येथे दोन दिवसाचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोंबर रोजी भूम येथील श्री गुरुदेवदत्त हायस्कुल येथे आयोजित करण्यात आले आहे.

या मोफत आरोग्य तपासणी शिबीरामध्ये मोफत आरोग्य तपासणी, कॅन्सर तपासणी, डोळ्यांची तपासणी, रक्तक्षय तपासणी, हृदयरोग तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, रक्त तपासणी, हाडांची तपासणी, इसीजी तपासणी, सिकलसेल तपासणी, रक्तगट तपासणी, चष्म्यांचे नंबर काढून वितरण व औषधी वितरण याशिवाय या महाआरोग्य शिबीरात तपासणी नंतर औषधी, वैद्यकीय साहित्य (चष्मे इ.) तसेच आवश्यक त्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया ही पूर्णतः मोफत केल्या जाणार आहेत.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.


 
Top