उमरगा (प्रतिनिधी)-महाराष्ट्र गणेश मंडळांच्या आजोबा गणपती म्हणून ओळख असलेल्या गणेश मंडळाने संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा, उखाणे स्पर्धा व रक्तदान शिबीरासह विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये सोमवारी आयोजित रक्तदान शिबीरात 27 गणेशभक्तांनी रक्तदान केले.

उमरगा येथील महाराष्ट्र गणेश मंडळांचा गणपती हा आजोबा गणपती म्हणून ओळखला जातो. या गणेश मंडळांच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सोमवारी (दि.25) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 27 गणेशभक्तांनी रक्तदान केले. तसेच उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सुरज वाडीकर, उपाध्यक्ष प्रशांत शिरगुरे, निखील महाकाली, बसवराज स्वामी, धनराज कांबळे, मंगेश चिंचोलीकर, तानाजी घोडके आदींनी परिश्रम घेतले.



 
Top