धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यात मागील महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे शेतातील सोयाबीन सह अन्य पिके करपून वाया गेले आहे, त्यामुळे सरकारने धाराशिव जिल्हा  दुष्काळ म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा तात्काळ द्यावा या मागणीचे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने  जिल्हाधिकारी यांना दिनांक 01 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात असे म्हंटले आहे की धाराशिव जिल्ह्यातील 57 पैकी 34 मंडळ 25% अंग्रीमसाठी मंजूर करण्यात आले परंतु जिल्ह्यात सर्व ठिकाणी दुष्काळ असून 57 पैकी 57 मंडळे अग्रीमसाठी घेण्यात यावी. यासह जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता पाहूण पाणी पुरवठा व चारा छावणी लवकरात लवकर चालू कराव्यात.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ देण्यात यावे अन्यथा 15 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव  समोर तिव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी वगरे, विधी व न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष शमशुद्दीन सय्यद, तालुकाध्यक्ष सचिन देवकते, अश्रुबा कोळेकर, सोमनाथ धायगुडे, जमीर पठाण,रमाकांत लकडे, राजेश मिटकरी, आकाश क्षीरसागर, विठ्ठल खटके, अशोक गाडेकर आदीं सह राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top