तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथील  हिंगळजदेवी मंदिरात सतराव्या शतकातील श्री भगवान शिवशंकर यांचे मंदिर असून या मंदिरातील शिवशंकराची मुर्ती चक्क गोलाकार फिरते.

धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथे हिंगळजदेवी मंदिर असून याच मंदिरात 1694 ला बांधलेले श्री भगवान शिवशंकर यांचे मंदिर असून मुर्ती पाषाणाची असून याच मंदिरातील शिवशंकराची मुर्ती चक्क गोलाकार फिरणारी असून मुर्तीच्या खालच्या भागात विशिष्ट ठिकाणी बेअरींगसारखी सुव्यवस्था करण्यात आल्याने शिवशंकर यांची मुर्ती चक्क गोलाकार फिरते. याचं मंदिरात गणपती, गरूडावर बसलेले लक्ष्मी विष्णू, सूर्यनारायण,महीषासुराचा वध केलेल्या  मुर्ती असून त्यांचे अत्यंत रेखीव व कोरीव काम केलेले आहे .मंदिराच्या प्रवेश द्वारावर हनुमंताची मूर्ती उत्कृष्ट कलाकुसरीची कोरलेली आहे.मंदिराच्या समोर दगडी नंदी असून आकर्षण व हुबेहूब कलाकृती कोरलेली आहे.हिंगजळदेवी मंदिरात श्री.भगवान शिवशंकराची गोलाकार फिरणारी मुर्ती पाषाणाची असल्याने भाविक भक्त आवर्जून याठिकाणी दर्शनासाठी जातात.


 
Top