धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीची 12वी वार्षीक सभा बुधवार दि.27 सप्टेंबर रोजी आंबेडकर कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली.
सभेच्या सुरवातीस चेअरमन ॲड. चित्राव गोरे यांनी उपस्थीत सभासदांचे स्वागत करुन अवाहल सालातील दिवंगताना श्रध्दांजली वाहून सभेच्या कामकाजास सुरवात झाली.
विषय पत्रिकेवरील विषयानुसार सभेत वाचलेनंतर त्यास सभासदांनी एकमताने मान्यता दिली. सभेचे कामकाज सपलेनंतर ॲड. गोरे यांनी केंद्र शासनाने मल्टीस्टेटे कायदयात केलेले बदल सागुन आपल्या संस्थेच्या कामकाजात होणा-या अमुलाग्र बदलाची माहीती सभेस देवून नविन कायद्यातील दुरुस्त्यानुसार संस्थेच्या कामकाजास आपले बापुढेही असेच सहकार्य रहावे ही अपेक्षा व्यक्त केली.
तदनंतर संस्थेशी सलग्न संस्था हिंगळजाई प्रोडयूसर कंपनीच्या 6 व्या वार्षिक सभेच्या अनुषंगाने संस्थेमार्फत चालविणेत येत आसलेल्या चिखली व उजनी येथील सोयाबिन खरेदी केंद्रावरील कामकाजाची तसेच संस्थेच्या तळेबंदाचे विवेचन केले. तदनंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अरविंद (दादा) गोरे यांनी कारखाना, मल्टीस्टेट, हिंगलजाई प्रोड्यूसर के. व राजर्षी शाहू पंतसंस्था यांच्या समन्वयातून कामकाज करणेत येत आसल्यामुळे शेतकराच्या अर्थकारणास बळकटी देणेत येत असल्याचे प्रतिपादन केले. वरील सर्व संस्थानी बापुढेही असेच शेतक-याच्या अर्थीक उन्नतीसाठी कार्यकरावे असे अहवान करून यापुढेही
सर्व संस्थाच्या सभासदानी सहकार्यने काम करणेबाबत अपेक्षा व्यक्त केली. शेवटी संस्थेचे संचालक श्री. युवराज राजेनियालकर यांनी उपस्थीत सभासद विशेषतः महिला सभासद, हितचिंतक कारखाना संचालक मंडळ, पतसंस्था संचालक मंडळ, कर्मचारी यांचे अभार मानून सभा संपल्याचे जाहिर केले.