धाराशिव (प्रतिनिधी) - अंगणवाडीमधील बालक, शाळेमधील विद्यार्थी व रुग्णालयातील रुग्णांना देण्यात येणारा पोषण आहार हा अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुळे त्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचार जनविरोधी आंदोलनचे धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज खरे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि. ऑगस्ट रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, अंगणवाडीमधील बालक, शालेय विद्यार्थी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारसाठी दाखल असलेल्या रुग्णांना देण्यात येणारा शालेय पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा देण्यात येतो. हा आहार शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दिले जात नाहीत. त्यामुळे शासनाचे जे ध्येय धोरण या आहाराबाबत चालू केले आहे. ते ध्येय साध्य होत नाही. म्हणजेच ठरवून दिलेल्या कॅलरीज उर्जा मिळत नाहीत. त्यामुळे ते विद्यार्थी सदृढ व सशक्त होत नाहीत. तसेच रूग्ण बरे होण्यासाठी पौष्टीक आहार देणे अपेक्षित व बंधनकारक आहे. परंतू आहार 

निकृष्ठ दर्जेचा करून त्यामध्ये जास्तीचा भ्रष्टाचार केला जात आहे. त्यामुळे सहाय्यक आयुक्तांनी शासनाकडून मिळणार्‍या आहाराकडे वारंवार लक्ष दिले तर म्हणजे वारंवार हे आहार शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार होतात का ? यांच्या तपासण्या केल्या तर यामध्ये भ्रष्टाचार कमी होवून आहार देखील चांगल्या प्रतीचा तयार होईल. तसेच चांगल्या प्रतीचा आहार पौष्टीक, चांगल्या दर्जेचा तयार होईल. त्यामुळे जिल्हाभरातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा व रुग्णालयातील आहार प्रयोग शाळेत तपासावेत. यामध्ये जर आहार नियमानुसार नसेल तर त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करून गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी खरे यांनी केली आहे.


 
Top