धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठा महासंघाच्या धाराशिव तालुकाध्यक्षपदी शंकर बाजीराव सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. धाराशिव येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र सूर्यवंशी यांना देण्यात आले.
संघटनेच्या पदाचा उपयोग कै.अण्णासाहेब पाटील यांचे विचार आणि अखिल भारतीय मराठा महासंघाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी व मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी करावा. सर्वसामान्य, सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी व मराठा समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तन, मन, धनाने तत्पर राहून सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू आगरकर, दत्ता जाधव, मार्गदर्शक प्रसाद धाबेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रमोद सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, राहुल पाटील, मालोजी सूर्यवंशी, कृष्णा सूर्यवंशी, सागर शेळके, आकाश गव्हाणे, निखिल पाडुळे, सुनिल सूर्यवंशी, ईश्वर शेलार, सर्जेराव मोहीते, राजेश सूर्यवंशी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शंकर सूर्यवंशी यांच्या निवडीचे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकार्यांसह सदस्यांनी स्वागत केले आहे.