तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देविजींचे प्राचीन मौल्यवान अशा सात डब्यातील  सोने, चांदीच्या दागिन्यांची पुर्नमोजणीच्या  गुरुवार दि. 3 ऑगस्ट रोजी  पुर्ण झाली असुन सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक  व महंत कडील दागिने मोजणी बाकी  आहे. ती मोजणी पुर्ण झाल्यानंतर अहवाल तयार करण्यास चार ते पाच दिवस जाणार असुन नंतर संपुर्ण अहवाल श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथाजिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार आहे.

श्री तुळजाभवानी मातेचे पुरातण सोनेचांदी दागदागिने गहाळ पार्श्वभूमीवर मंदिर संस्थान अध्यक्षांनी पुर्न मोजणी आदेश दिले होते. त्या अनुंषगाने सात डब्यातील पुरातन दागदागिने मोजदाद पुर्ण झाली आहे,

दररोज मोजलेल्या दागदागिने दैनंदिन मोजणी होताच त्याची माहीती सील केली जात आहे. अजुन  महंत व सहाय्यकधार्मिकव्यवस्थापक यांच्या कडील दागिने मोजदाद  शिल्लक  असुन ती मोजदाद  सोमवार पासुन   केली जाणार असल्याचे समजते ते पुर्ण  झाल्यानंतर अहवाल तयार करुन तो जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार आहे. या अहवलाकडे भाविकांसह शहरवासियांचे लक्ष लागले आहे. जर दागिने गहाळ झाले तर कुणाला दोषी धरणार ? कुणावर कारवाई होणार ? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 
Top