तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील ढेकरी येथील: माऊली मंदिरासमोरून अज्ञात व्यक्तीने मोटार सायकल चोरून नेल्याची घटना 30 जुलै 2023 रोजी घडली या प्रकरणी शुक्रवार दि. 04/08/2023 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तुळजापूर शहरात मोटार सायकल चोरीचा घटना वाढत असताना आता ग्रामीण भागात ही चोरट्यांनी आले लक्ष केल्याने दुचाकी धारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या बाबतीत अधिक माहीती अशी की संजय  हरीभाउ शेंडगे, रा. ढेकरी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 2800 (28,000)रुपये किंमतीची होंडा शाईन मोटरसायकल क्र एम एच 25 एएन 1016 ही दि. 30/07/2023 रोजी 6 वाजण्याचा सुमारास माउली मंदिरासमोर ढेकरी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. या प्रकरणी संजय शेंडगे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांन विरोधात तुळजापूर पोलिस . ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top