धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये रानकवी ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्याध्यापक साहेबराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रम प्रसंगी रानकवी ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करून यांच्या जीवनाविषयी  पर्यवेक्षक जाधव आर.बी यांनी विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक गायकवाड के. वाय व देशमुख डी. ए उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  केंगार दिपक  यांनी केले तर आभार नरसिंह साळुंके यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनीचे सहकार्य लाभले.


 
Top