तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काक्रंबा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 51 दात्यांनी रक्तदान केले. प्रथमता साहित्यत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवुन रक्तदान शिबीरास आरंभ करण्यात आला.
यावेळी सुरेश भिसे, सरपंच कालिदास खताळ, माजी उपसरपंच अनिल बंडगर, ग्रा. पं. सदस्य विकास भिसे, सुजित घोगरे, सद्दाम मुलानी, ग्रामसेवक जिलानी तांबोळी, पोलिसपाटील प्रमोद खताळ, हरिदास वट्टे, अशोक देवगुंडे, उमेश पाटील,अरविंद कानडे, नंदकुमार देवगुंडे, विनोद साबळे, किसन देडे, अरविंद
चंदनशिवे, चेतन बंडगर सचिन देडे, नरसिंग भिसे, अनिल देडे, वासुदेव भालेराव, अमोल भिसे, जयराज झोंबाडे, करन भिसे, अक्षय झोंबाडे, नामदेव ढेरे, बाबुराव पाटील आदी सह ग्रामस्थ उपस्थित
होते.