तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे जिल्हा निवडणूक कार्यालय उस्मानाबाद यांच्या माध्यमातून तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदार नोंदणी अभियान हा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी मार्गदर्शन करताना राहुल लबडे यांनी वरील प्रतिपादन केले.

भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार दि. 1/1/2024  या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादिचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून स्वीप कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धी साठी निवडणूक विषय फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, युट्यूब आदि सोशल मीडियावर लाईक, शेअरचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक स्तरावर प्रसिध्दी देण्याकरिता राहुल रामराव लबडे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना ते म्हणाले की, तरुणांनी मतदान यादी मध्ये 18 वर्षे पूर्ण झाल्याबरोबर मतदान यादीमध्ये नाव नोंदणी करुन घ्यावे, यासाठी बी.एल.ओ हे अॅप्लीकेशन डाउनलोड करून घ्यावे अतिशय सरळ व सोप्या भाषेत सदर अॅपवर आपणांस माहीती उपलब्ध होईल. याप्रसंगी प्रा. डॉ. बालाजी गुंड, प्रा.विवेकानंद चव्हाण यांनी देखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नायब तहसीलदार पांचाळ, प्रा. धनंजय लोंढे तसेच राहुल लकडे यांचे सर्व सहकारी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा. वागदकर एस.पी यांनी मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एम. मणेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.


 
Top