धाराशिव (प्रतिनिधी)-लोणावळा येथे सरपंच परिषदेची एकदिवसीय सर्वसाधारण वार्षिक सभा, तालुका,जिल्हा व राज्य विस्तार मेळावा संपन्न झाला.यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या माध्यम प्रमुखपदी राजकीय कट्टाचे संपादक प्रा.सतिश मातने यांना नियुक्तीचे पत्र सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते देण्यात आले. 

यावेळी थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार डॉ.चेतन नरके मानिनी फाउंडेशन महाराष्ट्राच्या प्रमुख डॉ. भारती चव्हाण, दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट पुणेचे प्रमुख अमेय जोशी,नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात, सरपंच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा झिनत सय्यद,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, मार्गदर्शक शंकर खापे, सरचिटणीस प्रवीण रणबागुल, संघटक कोहिनूर सय्यद, सहसचिव रमेश कोकाटे, प्रसिद्धी प्रमुख अनिल आगलावे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष सतीश सोन्ने, उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष सुजित हंगरगेकर, महिला जिल्हाध्यक्ष प्रियंका रणबागुल, गोरमाळा सरपंच अमोल औताडे, उटणे सरपंच संजय आसलकर, चांदवडचे सरपंच अशोक माने उद्योजक हनुमंत पाटील यांच्यासह राज्यभरातील विविध गावचे सरपंच, सरपंच परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्यभरात एकूण 28 हजार सदस्य असून सरपंचाच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना आहे.

 
Top