परंडा (प्रतिनिधी)- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, थोर विचारवंत, साहित्यिक, समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि प्रखर राष्ट्रभक्त, थोर क्रांतिकारक, असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अॅड. गणेश खरसडे, विकास कुलकर्णी, अॅड. जहीर चौधरी, विठ्ठल तिपाले, तानाजी पाटील, तुकाराम हजारे, महादेव बारस्कर, साहेबराव पाडुळे, सुरज काळे, अविनाश विधाते, सिध्दीक हन्नुरे, अॅड. विनोद गोडगे, श्रीमंत शेळके, हुसेन हन्नुरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते