धाराशिव (प्रतिनिधी)- तेर येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व येडशी येथे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
तेर हे जवळपास 30 हजाराहून अधिक लोकसंख्येचे गाव असून सभोवतालच्या गावची बाजारपेठ आहे. या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री गोरोबा काकांचे मंदिर असून प्राचीन इतिहासाची साक्ष देणार्या वास्तू व पुराणवस्तू संग्रहालय आहे. देशभरातील अनेक भाविक व पर्यटक येथे आवर्जुन येतात. त्यामुळे गाव व सभोवतालच्या गावातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रीवर्धन करून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी आमदार पाटील यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आभार व्य्नत केले.