धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुणयतिथीनिमित्त निमित्त प्रथम त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर मुख्याध्यापक बशीर तांबोळी व शाळेतील शिक्षक श्री दिनेश पेठे यांनी दोन्ही नेत्यांच्या जीवन चरित्रावर व स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान, प्रतिकूल परिस्थितीत ही त्यांनी केलेले कार्य या विषयी  मुलांना माहिती सांगितली व कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत माने यांनी केले व आभार श्रीमती राधाबाई वीर यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top