धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्ह्यात आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, ईद मिलाद, दिपावली, आदी सह सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत, या दरम्यान कुठल्याही जाती धर्मानमध्ये तेढ निर्माण होवू नये. सर्व सण उत्सव सर्व समाज घटकांनी एकत्रीत रित्या आंनदाने साजरे करावेत. यासाठी जलद कृती बल (रॅपीडॅक्शन फोर्स) व उमरगा व नळदुर्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदारासह उमरगा व नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत दि.24.08.2023 रोजी पथसंचलन करण्यात आले.

समाज विघातक/असामाजिक प्रवृत्तींमुळे समाजात धार्मीक असहिष्णुता पसरुन सार्वजनिक शांतता भंगाच्या दुर्देवी घटना देशभरात यापुर्वी अनेकदा घडल्या आहेत. येणाऱ्या आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव आणि नजीकच्या काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या शांततेत भयमुक्त वातावरणात पार पाडल्या जाव्यात व या दरम्यान समाज कंटकांकडून सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये, त्यांच्यावर जरब निर्माण व्हावी आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राहवी, या उद्देशाने उस्मानाबाद जिह्यातील उमरगा व नळदुर्ग शहरातील विविध भागांतुन जलद कृती दलासह धाराशिव पोलीस दल यांचे संयुक्त पथसंचलन करण्यात आले. यावेळी उमरगा शहरातील अशोक चौक- आरोग्य कॉर्नर- इंदिरा चौक-महादेव मंदीर- शिंदे गल्ली- रविंद्र गायकवाड सर यांचे घर- जुनी पेठ- हानुमान मंदीर- काळे प्लॉट- शाहरुख किराणा स्टोअर्स- आबादी मस्जीद- जि. प. शाळेच्या गेट समोरुन बालाजी मंदीर- आंबेडकर पुतळा त पोलीस ठाणे उमरगा अशा संवेदनशिल भागातुन रुट मार्च काढण्यात आला. तसेच नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील बस्वेश्वर चौक-भवानी चौक-अहिल्यादेवी होळकर चौक-बसस्थानक एरिया- मुळे नगर- नगर परिषद- कुरेशी गल्ली- किल्ला गेट अशा संवेदनशिल भागात रुट मार्च काढण्यात आला व या दरम्याण जनतेशी संवाद साधण्यात आला.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखली, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जलद कृती (रॅपीडॅक्शन फोर्स) दलाचे डेप्युटी कमांडंट  विरेंद्र यादव, कंपनी कमाडंर कृष्ण कुमार चंद्रा, उमरगा डिव्हिजनचे उप विभागीय  पोलीस अधिकारी रमेश बरकते, उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डी.बी. पारेकर, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्राभारी अधिकारी लोखंडे, यांचे सह जलद कृती बलाचे 60 जवान व उमरगा व नळदुर्ग पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार असे सदर पथसंचलनात सहभागी झाले. 


 
Top