धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्हयामध्ये पाऊस गेल्या 3 ते 4 आठवड्यापेक्षा अधिकचा खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीपच्या सर्व उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट व नुकसान झाले असून पावसाच्या ओढीमुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे पीक विम्यापोटी 50 टक्के अग्रीम नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (बाळासाहेब) च्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.24 ऑगस्ट रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील सर्व पिके सुकू लागले आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयाप्रमाणे पावसातील खंडामुळे उत्पादनात 50 टक्क्यापेक्षा अधिक घट दिसून येत असल्यास 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याची तरतुद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात आजवर अत्यंत कमी व अत्यल्प पाऊस झाला आहे. तसेच 3 ते 4 आठवड्यांपेक्षा अधिकच्या खंडामुळे शेतकऱ्यांना 50 टक्के अग्रीम नुकसान भरपाई मिळणे अभिप्रेत आहे. खरीपाची पिके नगदी उत्पन्न देणारी असल्यामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मुख्यतः याच पिकांवर अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकांच्या नुकसानपोटी तात्काळ मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने होणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये खरीप 2023 मधील पावसातील खंडाबाबत आदेशित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीपोटी 50 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला आदेशित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, मागासवर्गीय शिवसेना जिल्हाप्रमुख अमित बनसोडे, विधानसभा संघटक अमोल पाटील, युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, शिवसेना नेते नितीन पाटील, संतोष पवार शिवसेना उपशहर प्रमुख रजनीकांत मळाळे, शिवसेना उपशहर प्रमुख संकेत हाजगुडे, शिवसेना शहर संघटक रणजीत चौधरी, युवा सेना शहर प्रमुख कृष्णा हुरघट , अमर माळी, रवी गिरी, पांडुरंग घोगरे, प्रवीण पवार,अनंत भकते,गुणवंत देशमुख,दता तिवारी,नवनाथ सुरवसे,शंकर थोरात, प्रशांत पाटील,अजिंक्य आगलावे, बालाजी सूर्यवंशी, काका खोत, सुनील पाटील, आशिष खोबरे, रोहन गाढवे,गणेश गाढवे, ज्ञानेश्वर ठवरे, शुभम पांढरे, अजिंक्य आगलावे, दिनेश तुपे, गजानन जगताप, देवळाली सरपंच अजय सपकाळ, धनाजी साळुंखे, राजेश माळळे, अक्षय माळी,लखन जिरमिरे, सोमनाथ वावरे, कमलाकर दाणे,शिवसैनिक, युवा सैनिक, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अग्रीमसह अनुदान देण्यात यावे
नुकसानपोटी अग्रीम रक्कम विमा कंपनीकडून तर द्यावीच. त्याबरोबरच शासनाने शेतकऱ्यांना अनुदान देखील द्यावे. कारण पावसाचा खंड पडल्यामुळे पूर्ण खरीप हंगामातील पिके वाया गेली असून पेरणी, खत व बियाणांचा खर्च देखील निघू शकत नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना आर्थिक मदत व धीर देण्यासाठी शासनाने नुकसानीपोटी अनुदानाची रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना केले