धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, ईद मिलाद, दिपावली, आदी सह सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत, या दरम्यान कुठल्याही जाती धर्मानमध्ये तेढ निर्माण होवू नये. सर्व सण उत्सव सर्व समाज घटकांनी एकत्रीत रित्या आंनदाने साजरे करावेत. यासाठी जलद कृती बल (रॅपीडॅक्शन फोर्स) परंडा व वाशी  पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदारासह परंडा व वाशी  पोलीस ठाणे हद्दीत आज दि.26.08.2023 रोजी पथसंचलन करण्यात आले.

समाज विघातक/असामाजिक प्रवृत्तींमुळे समाजात धार्मीक असहिष्णुता पसरुन सार्वजनिक शांतता भंगाच्या दुर्देवी घटना देशभरात यापुर्वी अनेकदा घडल्या आहेत. येणाऱ्या आगामी काळात परंडा व वाशी शहरात साजरा होणारा गणेश उत्सव व नवरात्र उत्सव आणि नजीकच्या काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या शांततेत भयमुक्त वातावरणात पार पाडल्या जाव्यात व या दरम्यान समाज कंटकांकडून सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये, त्यांच्यावर जरब निर्माण व्हावी आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राहवी, या उद्देशाने उस्मानाबाद जिलह्यातील परंडा व वाशी  शहरातील विविध भागांतुन जलद कृती दलासह उस्मानाबाद पोलीस दल यांचे संयुक्त पथसंचलन करण्यात आले. यावेळी परंडा शहरातील गोल्डन चौक- मदीना चौक- पालामस्जीद मेन रोड- मंगळवार पेठ- महात्मा फुले चौक- भिमनगर- दर्गा रोड- कुरेशी गल्ली-  मंडई पेठ- आझाद चौक- नरसिंग नगर- छत्रपती शिवाजी महाराज चौक- खोडवा चौक- निजामपूर मेन रोड अशा संवेदनशिल भागातुन रुट मार्च काढण्यात आला.तसेच यावेळी वाशी पोलीस ठाणे हद्दीत वाशी शहरातील  पारा चौक- वेरेंनटेशन चौक लक्ष्मी रोड- छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा संवेदनशिल भागातुन रुट मार्च काढण्यात आला.  व या दरम्याण जनतेशी संवाद साधण्यात आला.

 पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखली, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जलद कृती (रॅपीडॅक्शन फोर्स) दलाचे डेप्युटी कमांडंट विरेंद्र यादव, कंपनी कमाडंर कृष्ण कुमार चंद्रा, भुम डिव्हिजनचे उप विभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरामठ, परंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  विनोद इज्जपवार, वाशी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी-  शंशीकांत दासुरकर यांचे सह जलद कृती बलाचे 60 जवान व परंडा व वाशी पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार असे सदर पथसंचलनात सहभागी झाले.


 
Top