धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023 -24 पासुन नव्याने बीसीए अभ्यासक्रमाकरिता महाराष्ट्र शासनाकडून मान्यता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या कडून संलग्निकरण प्राप्त झालेले आहे.बी.सी.ए. पदवीच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी दिली. गरजू विद्यार्थ्यांनी त्वरित महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा.
बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कला, वाणिज्य,विज्ञान व एम.सी.व्ही.सी विद्यार्थ्यांसाठी सध्या बीसीए करिता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या पदवीसाठी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रवेश घेऊन महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.