तुळजापूर (प्रतिनिधी)-आपली सुट्टी संपवून तुळजापूरहून पठाणकोट व तेथून पालमपूरकडे कर्तव्य बजावण्यासाठी आर्मी गाडीतून जात असताना झालेल्या अपघातात शहीद झालेले विजय मोहन दरेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमात तुळजापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद विजय दरेकर 28 जुलै 2023 रोजी आपली सुट्टी संपवून तुळजापूर येथून देश सेवेसाठी पठाणकोटला गेले होते. कर्तव्य बजावण्यासाठी जात असताना त्यांच्या आर्मी गाडीचा अपघात होवून त्यात दरेकर शहीर झाले होते. त्यांचे पार्थिव बुधवार दि. 2 ऑगस्ट रोजी पठाणकोट वरून सैन्य दलाच्या विमानाने पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर एका विशेष गाडीने पार्थिव तुळजापूरकडे रवाना करण्यात आले. गुरूवार दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी सजवलेल्या ट्र्नटरमध्ये शहीद विजय दरेकर यांचे पार्थिव शरीर ठेवण्यात आले होते. ठिकठिकाणी त्यांच्या पार्थिवावर लोकांनी पुष्प वृष्टी केली. त्यानंतर वैकुंटधाम स्मशानभुमीत शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद दरेकर यांना पोलिस विभागाच्यावतीने सशस्त्र मानवंदना देण्यात आली. तर सरकारच्यावतीने तहसीलदार बाळासाहेब बोळंदे व पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. अंत्यविधी यात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

 
Top