उमरगा (प्रतिनिधी)-तथागत भगवान बुद्धांनी कुख्यात दरोडेखोर अंगुलीमालाला त्यांच्या मैत्रीबलाच्या प्रतापाने जिंकले आणि तो भगवान बुद्धाचा शिष्य झाला. त्याच प्रमाणे प्रत्येकांनी आपल्या हृदयात मैत्रिभावणेचा विकास करून सर्व मानवावर समान मैत्रीचा वर्षाव करावा असा उपदेश भंते सुमंगल व अनागरिक मिलिंद कांबळे उमापूरकर यांनी आपल्या प्रवचनातून दिला.

श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने मंगळवारी कराळी येथील दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी भंतेजी बोलत होते. कार्यक्रमास ट्रस्टचे उपाध्यक्ष एम. एस. सरपे, कोषाध्यक्ष कैलास शिंदे,डॉ.पंडित किल्लारीकर, धम्मचारी प्रज्ञाजित, धम्मचारी धम्मभूषण,सतीश कांबळे, रिपाइंचे एस.के.कांबळे (चेले),प्रा किरण सगर,बसवकल्यानं येथील भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष नागनाथ वाडीकर, नवनाथ कवठेकर आदींची उपस्थिती होती.

या वेळी ट्रस्ट च्या वतीने लघु पाटबंधारे उप अभियंता पदी प्रमोशन झाल्याने संजय सरपे, अडँ हिराजी पांढरे, डॉ अवंती सगर, शिल्पा सुरवसे यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने गुणवंताचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर कराळी येथील विहाराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी  कोटींचा निधी आणल्याने प्रचंड साधुकाराच्या गजरात कैलास शिंदे आणि एम.एस. सरपे यांनी आभार मानले.

सिद्धार्थ गायन पार्टीच्या कलाकारांनी भीम बुद्ध गीते सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एस.सरपे यांनी केले. प्रास्तविक कोषाध्यक्ष कैलास शिंदे यांनी केले. तर डी.टी.कांबळे यांनी आभार मानले.कार्यक्रमास मिलिंद कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संतोष सुरवसे, संतोष जाधव, आनंद कांबळे, सुभाष काळे, आदींनी पुढाकार घेतला होता.श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांना काल कथित स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मणराव कांबळे यांच्या समरणार्थ पंडित किल्लारीकर यांनी भोजन दान दिले.


 
Top