धाराशिव  (प्रतिनिधी) - शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये गुरुवर्य स्व.के.टी. पाटील सर यांचा शाळेच्या प्रागंणात साकारण्यात येणाऱ्या पुतळा स्मारकासंबधी मार्गदर्शन बैठक जिल्हा व परिसर शहरातील सर्व स्तरातील प्रतिष्ठीत स्मारक समिती पदाधिकारी सदस्य मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. प्रथम स्मारक आयोजक तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंदळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी गुरुवर्य स्व. के.टी. पाटील सर यांच्या स्मारकाबाबत प्रास्ताविक केले. नियोजित स्मारक , संग्रहालय , ग्रंथालय अश्या अनेक बाबीसह सुसज्ज भव्यस्मारक उभारणार अशी माहिती देऊन पुतळा अनावरण समारंभास उपस्थितीचे निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर स्मारक बैठकीस निमंत्रित उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनपर सुचना केल्या व हभप बोधले महाराज, विधीज्ञ सुधाकर मुंढे, अमर देशमुख, कुणाल निंबाळकरांनी देणगी जाहीर केली. या स्मारक बैठकीस डॉ. अभय शहापुरकर, विश्वास शिंदे , भाऊसाहेब उंबरे, दत्ता कुलकर्णी, संताजी चालुक्य, डॉ.चंद्रजीत जाधव व्ही .जी.पवार , बाळासाहेब शिंदे, सौ. शिला उंबरे, युवराज नळे , राजाभाऊ ओव्हाळ, प्राचार्य जयसिंग देशमुख, प्रवीण पाठक , विधिज्ञ रवींद्र कदम, अक्षय ढोबळे , धनंजय पाटील , उमेश राजेनिंबाळकर, अभिषेक बागल ,संजय मंत्री , आशीष मोदाणी,शिवाजी पंगुळवाडे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, उद्योजक अभिराम पाटील स्व.के.टी. पाटील यांचे समवेतचे  सहकारी लाटेसर, बी.जी.जाधव , पडवळ, एस. व्ही.देशमुख, सुरवसे, वाय.के.पठाण स्व .पाटील स्तरांवरील आस्ता असणारे विद्यार्थी , संस्था चालक,  प्राचार्य ,मुख्याध्यापक, पर्यवेक्षक , शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते . सुत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले तर आभार संजय पाटील यांनी मानले.

 
Top