धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील निवृत्ती भवन समता नगर येथे जिल्हा संस्कार भारती समितीची बैठक संपन्न झाली बैठकीत प्रथम महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व .आर.आर.पाटील यांच्या जयंतीदिनी व माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संस्कार भारती ध्येयगीत प्रथेने बैठकीस सुरुवात केली. बैठकीत निवड अभिनंदणीय ठराव व नियोजित अनीवार्य कार्यक्रमाची यथासांग चर्चा झाली व  सर्वांनुमते समंत झाले. खेळीमेळीत संपन्न झाली. या बैठकीस संस्कार भारती देवगिरी प्रांत चित्रकला विधाप्रमुख तथा जिल्हा मार्गदर्शक कलाध्यापक शेषनाथ वाघ , जिल्हा कार्याध्यक्ष अनील ढगे , जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हासचिव प्रभाकर चोराखळीकर, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र कुलकर्णी, जिल्हानाट्यविधा प्रमुख धनंजय कुलकर्णी, जिल्हा संगीतविधा प्रमुख सुरेश वाघमारे, मुकुंद पाटील, अनील मालखरे , धनंजय जेवळीकर ,अभिजीत सोनटक्के उपस्थित होते. प्रसायदानाने बैठक संपन्न झाली.

 
Top