धाराशिव (प्रतिनिधी) - कै. श.मा.पाटील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार (पद्य विभाग) डॉ. शिवाजी शिंदे (सहायक कुलसचिव) सोलापूर, लिखित 'अंतस्थ हुंकार ' काव्यसंग्रहास घोषित करण्यात आला आहे.
तसेच कै. त्रिंबकदादा शेळके राज्यस्तरीय संस्था पुरस्कार (साहित्य,कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक) गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजनाची सोय करणा-या 'अन्नपूर्णा बहुउद्देशीय सामाजिक संस्था', धाराशिव यांना घोषित करण्यात आला आहे. कै. माधव गरड राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यापूर्वीच 'काटेरी कुस' कादंबरीचे लेखक आशिश देशपांडे यांना जाहीर झाला आहे. सदरील पुरस्कारांचे वितरण लवकरच समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल असे कलाविष्कार अकादमी चे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज नळे व मसाप अध्यक्ष नितीन तावडे यांनी सांगितले आहे.