धाराशिव (प्रतिनिधी)-मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस पूर्ण भारतामध्ये हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आमच्या एकलव्य आश्रम शाळा मंगरूळ (यमगरवाडी) ता.तुळजापूर या शाळेमध्ये सुद्धा हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आणि त्यानिमित्ताने शाळेतील विविध खेळाचे क्रीडा प्रशिक्षक हरीश मगदुम,प्रणिता शेटकार, आशोक बनकर, यशवंत निंबाळकर, बालाजी क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेतील मुला मुलींची क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. व क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रा.मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे मा.मुख्याध्यापक आण्णासाहेब कोल्हटकर यांनी केले.व हा क्रीडा दिन खूप मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.त्या वेळी शाळेतील सर्व क्रमचारी त्यात सहभागी झाले. अतिशय आनंदी वातावरणात स्पर्धा पार पडल्या मुळे संस्थेचे अध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी यांनी कौतुक केले.