धाराशिव (प्रतिनिधी) शेतकर्यांचे जीवनमान उंचावून त्यांना त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येण्यासाठी आयुष्यभर पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी धाराशिव जिल्ह्यातील प्रथम दौर्यात तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेऊन तुळजापूर येथील जिल्हा बैठकीत आपले मत व्यक्त केले.
ते पुढे बोलताना म्हणाले सध्या आपल्या देशासमोर खूप मोठी आव्हाने आहेत त्यामुळे ती बाजूला सारण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत त्यांनी गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात आपल्या देशाला जगामध्ये खूप महत्त्वाचे स्थान निर्माण केलेले दिसून येत आहे. त्यामुळे येणार्या काळात भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 2024 मध्ये तिसर्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी कंबर कसून काम करावयाचे आहे. शेतकर्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रामाणिकपणे भविष्यात सोडविणार असल्याचे तसेच प्रसंगी रस्त्यावर देखील उतरून शेतकर्यांच्या न्यायासाठी केंद्र राज्य सरकारच्या विविध योजना शेतकर्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करून शेतकर्यांचे अडीअडचणी समजून घेऊन दूर करण्यासाठी प्रयत्न करणार मला कधीही फोन करा मी सदैव शेतकर्यांच्या प्रश्नासाठी काम करायला तयार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी प्रदेश चिटणीस रंगनाथ सोळुंके, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्कप्रमुख तथा धाराशिव जिल्हा परिषदचे माजी सदस्य रामदास कोळगे यांनी आपले मत व्यक्त केले .
यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष शशिकांत देशमुख, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य सतीश देशमुख, नानासाहेब यादव, तुळजापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे उपसभापती संतोष बोबडे, प्रभाकर मुळे, दत्ता राजमाने, विनोद गंगणे, बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, तुळजापूर भाजपा शहराध्यक्ष शांताराम पेंदे, भाजपा ओबीसी आघाडीचे तथा बाजार समितीचे संचालक विजय शिंगाडे, राजकुमार पाटील, तालुकाध्यक्ष नाना कदम, विकास मलबा, बाळासाहेब शामराज, उमेश गवते, राजेश्वर कदम, महादेव रोचकरी, दिनेश बागल, पद्माकर गडदे, गणेश सोनटक्के, प्रशांत लोमटे, राणबा जाधवर इत्यादी मान्यवरासह मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.