धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथे अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यक्रमात मोठ्यास प्रमाणात राजकीय गटबाजी उफळून आली आहे. या कार्यक्रमाच्या कोनलिशावर पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे नावच नाही. तर भाजप व राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष यांना अधिकृत निमंत्रण दिले नसल्याचे दिसून आले. शानदार झालेल्या या कार्यक्रमात नेहमी प्रमाणेच राजकीय कलगीतुराही रंगला.
धाराशिव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यक्रमाचे प्रारंभ प्रधारमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते सकाळी 11.15 वाजता ऑनलाईन पध्दतीने झाला. हा कार्यक्रम लोकांसाठी व्हावा यासाठी रेल्वे विभागाच्यावतीने उस्मानाबाद रेल्वे स्थानकासमोर वॉटर पुफ मंडप मारला होता. व्हीआयपी व पत्रकार यांची एकाच ठिकाणी बसण्याची व्यवस्था केल्यामुळे राजकीय कार्यकर्ते व नेते यांच्यामुळे काही पत्रकारांना जागा मिळाली नाही. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागच्या रंगेत बसलेले भाजपचे जेष्ट नेते अॅड. मिलिंद पाटील यांना स्टेजवर बोलावले. या कार्यक्रमात नेहमी प्रमाणे खासदार ओमराजेनिंबाळकर व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात परंपरेप्रमाणे विकास कामावरून आरोप प्रत्यारोपाचा सामना व कलगीतुरा चांगलाच रंगला.
राजशिष्टाचार कायद्यानुसार तक्रार करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी पत्रकारांशी बोलताना या लोेकसभा मतदारसंघातील खासदार, आमदार यांची नावचे कार्यक्रमाच्या कोनशीलावर आहेत. पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच नाव का उगळले या संदर्भात आपण जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करणार असून, राजशिष्टाचार कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करणार आहे असे सांगितले.