धाराशिव (प्रतिनिधी)- वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ हे रविवार 27 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
27 ऑगस्ट रोजी सकाळी 7.00 वाजता मोटारीने कागल निवासस्थान येथून सोलापूरमार्गे उस्मानाबादकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता उस्मानाबाद शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 11.30 वाजता शिंगोली रोड येथील शासकीय विश्रामगृहात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कामकाजाबाबत आढावा बैठक. दुपारी 12.30 ते 1.00 विश्रामगृहात राखीव. दुपारी 1.00 वाजता मोटारीने बीडकडे प्रयाण.