नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील लक्ष्मण ऊर्फ प्रमोद कांबळे यांची कन्या पुजा लक्ष्मण (प्रमोद) कांबळे यांनी एमपीएससीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
पुजा कांबळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पदवी संपादन केली व महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेत अधिकारी म्हणुन नोकरी मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करून त्यांनी एमपीएससी परिक्षेची तयारी केली. राज्य कर निरिक्षक पदा करीता नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत सहभाग घेतला. सरद एमपीएससीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असुन या परिक्षेमध्ये पुजा कांबळे ही चांगले गुण मिळवुन उत्तीर्ण झाली आहे. लवकरच ती राज्य विक्रीकर निरिक्षक पदावर विराजमान होणार आहे.
तिने मिळविल़ेल्या या यशा बद्दल नळदुर्ग येथे रिपाइं (आठवले) चे दुर्वास बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, महादेव कांबळे,दत्ता बनसोडे, एस.के.गायकवाड, दत्ता सुरवसे, अरुण लोखंडे, बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे,परिवर्तन सामाजिक संस्थेचे मारूती बनसोडे,सम्राट ग्रुपचे पप्पु सुरवसे, डॉ.आंबेडकर इंग्लिश स्कूलचे संस्थापक मारुती खारवे,देवानंद बनसोडे,माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर,सहशिक्षक सचिन कांबळे, भैरवनाथ कानडे, युवा कार्यकर्ते अजय बागडे,विश्वास रणे,उमेश गायकवाड,जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठलबापू बनसोडे,बापू दुरुगकर,दिपक कांबळे सह कार्यकर्ते,नातेवाईक यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटुन,चौकात अभिनंदनाचा फलक लावुन आनंद व्यक्त केला असुन पुजा कांबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.