तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील श्री तुळजाभवानी मंदिर मधील दर्शन मंडपात सापडलेले सोन्याचे मणीमंगळसूत्र  बीव्हीजी सुरक्षारक्षक भिसे केदारनाथ नानासाहेब याने श्री तुळजाभवानी प्रशासनाकडे सपूर्द केल्याने या त्याचा प्रामाणिकपणाची दखल घेत  संतोष पाटील तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी त्याचा सत्कार केला. 

श्री तुळजाभवानी मंदिरामधील दर्शन मंडपात बीव्हीजी सुरक्षारक्षक भिसे केदारनाथ नानासाहेब यास अंदाजे एक ते दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र सापडले होते. त्याने प्रामाणिकपणाने ते मंगळसूत्र सुरक्षा विभागाचे दर्शन मंडप कंट्रोल रूम येथे जमा केले. त्याचा प्रामाणिकपणा पाहून संतोष पाटील तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी बीव्हीजी सुरक्षा रक्षक भिसे केदारनाथ नानासाहेब याचा सत्कार केला. यावेळी धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी विश्वास  सातपुते, बीव्हीजी सुपरवायझर बाळासाहेब बागल, सचिन पवार व इतर सुरक्षा रक्षक उपस्थित होते.


 
Top