धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील तेर, ढोकी, तडवळा, येडशी या गावची चार गाव पाणी पुरवठा योजना साधारणता पाच ते सहा वर्षा पासून बंद आहे.तेर येथील तेरणा धारणा मध्ये 2012 पासून मुबलक पाणी साठा उपलब्ध असतानाही केवळ प्रशासनाच्या ढिसल कारभारामुळे ही योजना बंद आहे यांचा नकारात्मक परिणाम म्हणजे वरील चारही गावातील गरीब माध्य्म् वर्गीय लोकांना पिण्या साठी तसेच नियमित वापरासाठी जास्त पैसे देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे.म्हणून आपल्याला विनंती वजा इशारा देण्यात येत आहे की,जर 15 दिवसात वरील योजना चालू झाली नाही तर आप तर्फे तेरणा धारणा मध्ये जल समाधी आंदोलन करण्यात येईल असे निवेदन ऑगष्टला जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.यावेळी जिल्हा संयोजक राहुल माकोडे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे,उस्मान मोरवे, मेहबूब शेख, अभिजीत देवकुळे, राजपाल देशमुख, आकाश कावळे, सुरेखा यादव, मुक्त्तार शेख, दत्ता कांबळे, चांद शेख आदी उपस्थित होते.