धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षकांना अतिरिक्त बीएलओचे काम देण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक सतीश कुंभार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून केली आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, बीएलओच्या या अतिरिक्त कामामुळे प्रचंड शारीरिक, मानसिक ,व आर्थिक त्रास शिक्षकांना होत आहे. याकडे तात्काळ लक्ष घालून शिक्षकांना शिकवण्याचे काम देऊन इतर बिलोच्या कामातून त्वरित मुक्तता करावी, शिक्षकांवरील अन्याय त्वरित थांबवा व न्याय देण्यासंदर्भात संबंधिताना आदेश द्यावेत अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आश्रम शाळा शिक्षक, कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक व इतर संस्थेतले शिक्षक व कर्मचारी तीव्र आंदोलन करतील, इशारा देण्यात आला आहे.