नळदुर्ग (प्रतिनिधी) -तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशच्या अध्यक्षपदी निजाम शेख तर उपाध्यक्षपदी शिवानंद खुने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नुतन कार्यकरणी सर्वानुमते जाहिर करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी निजाम शेख, उपाध्यक्षपदी शिवानंद खुने,सचिव गणेश जवळगे,सहसचिव किरण कांबळे, कार्याध्यक्ष अलीम शेख,संघटक शुभंक मायाचारी, कोषाध्यक्ष किशोर वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे कोर कमेटी सदस्य प्रसाद देशमुख,संजय कुंभार,लक्ष्मण दुपारगुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.यावेळी प्रशांत साळुंके,सुधाकर राठोड,रोहित राठोड,बाळू डॅंग,नितीन गायकवाड, महमंद इनामदार यांच्यासह अदि फोटोग्राफर संघटनेचे सदस्य उपस्थित होते.