तुळजापूर (प्रतिनिधी) -येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाला, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी तुळजाभवानी महाविद्यालयाच्या एन सी सी ५३ बटालीयनच्या कैडेटसने प्रा.जी व्ही बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक संचालन केले,भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हर घर तिरंगा अभियानांतर्गत दि. १३व १४  या दोन दिवशीसुद्धा तुळजाभवानी शैक्षणिक संकुलाच्या वतिने ध्वजारोहण करण्यात आले,सदर प्रसंगी तुळजाभवानी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दौंड, शिक्षणमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक यलगुंडे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेक कोरे यांनी तर आभार कनिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा जे.बी क्षीरसागर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोफेसर मेजर डॉ वाय ए डोके,प्रा धनंजय लोंढे यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी तुळजाभवानी महाविद्यालय, शिक्षणमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे विद्यालयाच्या एन सी सी विभागाच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन देखील करण्यात आले.

 
Top