तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांनी शाळेच्या परिसरात औषधी वनस्पतींची बाग फुलवली आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांनी मुलींना औषधी वनस्पती, भाजीपाला वनस्पती,फुल झाडे यांची माहिती व्हावी म्हणून प्रशालेच्या प्रांगणात औषधी वनस्पती बाग फुलवली आहे.
प्रशालेच्या प्रांगणात आद्रक,अळू,गवती चहा,तुळस, लाजाळू, कोरफड,अक्कलखार,सबजा या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.तर टोमॅटो,बटाटे,शेवगा,वांगी,कोबी,हिरवी मिरची, सिमला मिरची,चुका,पालक, कोंथिबीर, भोपळा,घोसावळा या भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे.तर शेवंती, गुलाब,कबुली,मनिप्लॅट, जास्वंद, झेंडू या फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे.
विद्यार्थीनीना औषधी वनस्पतींची ओळख होणे, विविध वनस्पतींची जवळून अभ्यास करणे, सेंद्रिय खतांचा वापर करून तयार केलेली भाजी शालेय पोषण आहारामध्ये वापरणे, विद्यार्थीनीनी प्रशालेतील परसबागेचा आदर्श घेऊन घरीही परसबाग तयार करावी, स्वनिर्मितीचा आनंद मिळावा हा औषधी वनस्पतींची बाग तयार करण्याचा प्रमुख उद्देश आहे.
सुरेखा कदम, मुख्याध्यापिका,
जिल्हा परिषद कन्या प्रशाला, तेर ता.धाराशिव