तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सुरतगांव येथील गट नं. 245 मधील समाईक जमीनीच परस्पर फेरफार केल्या प्रकारची सखोल चौकशी संबंधित दोषीवर कारवाई करण्याची मागणी नाना नारायण गुंड यांनी तहसिलदार मार्फत तानाजीराव सावंत, पालकमंत्री कक्ष संपर्क कार्यालय, उस्मानाबाद. यांच्या कडे केली आहे.
तुळजापूर तालुक्यातील सुरत गाव येथील नाना गुंड यांचा पुतण्या दिगंबर दत्तात्रय गुंड हा वय 31 वर्षेरे धंदा नौकरी पुणे येथे राहत असून त्याचे नावे शेतजमीन गट नं. 245 मधील त्याचे हिस्याची जमीन मयत दाखवून संपूर्ण कमी केली आहे.गावातील मयत दिगंबर दत्तात्रय गुंड यांचे वारसाचे नावे नोंद घेणेत आलेली आहे. प्रकार हा गावकामगार तलाठी व मंडळ अधिकारी सावरगाव यांनी संगणमताने करून त्याचे जाहिर प्रगटन किंवा न देता परस्पर फेर केला आहे.या प्रकरणामध्ये गाव कामगार तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर निलंबनाची कार्यवाही व फौजदारीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. गुंड कुटूंबाला योग्य तो न्याय देऊन फेर रद्द करावा व पुतण्याच्या नावे दिगंबर दत्तात्रय गुड या नांवे नोंद घेणेत यावी अशी मागणी निवेदन ध्दारे नाना नारायण गुंड यांनी केली आहे.