वाशी (प्रतिनिधी)-दि. 30 ऑगस्ट 2023 रोजी  पोलीस स्टेशन वाशी येथे राखी पौर्णिमेनिमित्त पोलीस निरीक्षक दसुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली राखी पौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना महिलांनी स्वतः तयार केलेली कवडची राखी बांधून रक्षा बंधन दिन साजरा केला.  यावेळी तालुका अभियान कक्षातील अशोक बांगर, संदीप लोंढे, गटातील महिला व  स्वाती खराडे, दीक्षा गाडे, मीना शिंदे, बँक सखी सुचिता जगताप, नीता मोरे या उपस्थित होत्या.


 
Top