धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संपूर्ण देशभरात भटके विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्रीय कल्याण बोर्डची स्थापना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केली आहे. या बोर्डाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील भटके विमुक्त समाज बांधवांच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला जातो व त्या अनुषंगाने योजना राबविल्या जातात  या महत्त्वपूर्ण अशा केंद्रीय भटके विमुक्त विकास आणि कल्याण बोर्ड च्या सदस्यपदी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील अणदूर येथील भूमिपुत्र तथा अभाविपचे माजी राष्ट्रीय मंत्री व भाजपाचे प्रदेश चिटणीस प्रवीण घुगे यांची देशाचे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी या भटके विमुक्त विकास आणि कल्याण बोर्डाच्या सदस्यपदी निवड केली आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील भूमिपुत्रास केंद्रीय पातळीवर काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. प्रवीण घुगे यांनी विद्यार्थी परिषद , भारतीय जनता पक्ष या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


 
Top