धाराशिव (प्रतिनिधी) - रोटरी क्लब धाराशिवच्या परिवारातील 17 सदस्य शुक्रवारी पहाटे 4 वाजता धाराशिव ते कन्याकुमारी अशा सायकल प्रवासाला निघाले आहेत.

रोटरी क्लब धाराशिवच्या सचिव डॉ. मीना श्रीराम जिंतूरकर यांनी झेंडा दाखवून रॅलीची सुरूवात केली.  प्रवासादरम्यान ठिकठिकाणी रोटरीच्या झेंड्यांचे आदानप्रदान होऊन मैत्रीचा संदेश दिला जाईल. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार होईल, सायकल वापराचे महत्व व संपर्कातून आशावादाचे घोषवाक्य सार्थ होईल.( Create Hope in the World) या सदस्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने रोटेरियन उपस्थित होते.

 
Top