धाराशिव (प्रतिनिधी)- गझल मंथन साहित्य संस्था,कोरपना रजि. नं. एफ - 15163 (चंद्रपूर) यांच्या वतीने गझलयात्री भाग  (महिला गझलकारा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येत आहे. गझल मंथन साहित्य संस्थेच्या प्रकाशन विभागाव्दारे महाराष्ट्रातील महिला गझलकारांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रकाशक तथा संपादक श्री.जयवंत वानखडे,यांच्या संपादनात  प्रातिनिधिक गझलसंग्रह मालिकेतील तिसरा प्रातिनिधिक गझलसंग्रह ’गझलयात्री भाग -’3 (महिला गझलकारा विशेषांक) प्रकाशित करण्यात येणार आहे. 

ज्यांना ह्या प्रातिनिधिक संग्रहात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट तीन गझल 9922667699 या   whatsapp क्रमांकावर दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गझल संकलनाचे कार्य संस्थेच्या पुणे विभाग सचिव वैशाली माळी करणार आहेत. पाठवलेल्या गझलांपैकी एक किंवा दोन गझल गझलयात्री  विशेषांकासाठी स्विकारण्यात येईल. गझल प्रकाशित करण्याचा वा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार संस्थेला व साहित्य निवड समितीला आहे. सदर  प्रातिनिधिक गझलसंग्रहात प्रसिद्ध होणार्‍या साहित्याबद्दल सन्माननीय साहित्यिकांना कोणत्याही प्रकारचे मानधन मिळणार नाही. किंवा गझलसंग्रहसुद्धा भेट देण्यात येणार नाही. सदर प्रातिनिधिक संग्रहाची प्रत हवी असल्यास ती आपणांस विकत घ्यावी लागेल. महिला गझलकारा विशेषांक असल्यामुळे कृपया पुरूष गझलकारांनी गझल पाठवू नयेत. संस्था गझलेच्या प्रचार व प्रसारासाठी सदर विशेषांक ना नफा ना तोटा या तत्वावर प्रकाशित करणार आहे त्यामुळे सर्व साहित्यिकांनी व गझल रसिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर (देवकुमार) भ्रमणध्वनी 8806360709, संपादक गझल मंथन प्रकाशन तथा सचिव गझल मंथन साहित्य संस्था जयवंत वानखडे भ्रमणध्वनी 9823645655 यांनी केले आहे.

 
Top