कसबे तडवळे - श्रीमती ठकुबाई भगवानराव जोशी यांचे स्मरणार्थ आणि वै. गोविंद हरी दंडवते यांच्या इच्छेनुसार प्रतिवर्षी, कसबे तडवळे पंचक्रोशीतील एका सैनिकास  किंवा माजी सैनिकास दिल्या जाणाऱ्या पुरस्कार व मानपत्र याचे मानकरी ठरले ते सिद्धेश्वरप्रसाद गोपाळराव जोशी. गेली अठरा वर्षे हा पुरस्कार दिला जातो.  सन्मानपत्र आणि रुपये 1001 असे या पुरस्काराचे स्वरूप असते. पुरस्काराची मूळ कल्पना ही वैकुंठवासी गोविंद हरी दंडवते यांची त्यासाठी लागणारे आर्थिक व्यवस्था  त्यांनी करून ठेवली आहे. सध्या दंडवते कुटुंबीय हा कार्यक्रम प्रतिवर्षी नेटाने चालवित आहेत. 

सिद्धेश्वरप्रसाद गोपाळराव जोशी हे कसबे तडवळे येथील रहिवासी असून सध्या त्यांचा निवास धाराशिव येथे असतो. नौदलामध्ये त्यांनी पंधरा वर्षे सेवा पूर्ण केली आहे. सध्या धाराशिव येथे भारतीय स्टेट बँकेत त्यांची सेवा चालू आहे.  संगीत ,साहित्य आदी क्षेत्रातही ते कार्यरत असतात. सत्काराला उत्तर देताना त्यांनी विद्यार्थ्यांना तिन्ही दलांची माहिती सांगितली व दंडवते कुटुंबीयांचे आभार मानले. तसेच आपल्या पुरस्कारातील रकमेत 1000 ची भर घालून दोन होतकरू विद्यार्थिनींना प्रत्येकी एक हजार रुपये त्याच व्यासपीठावरून पारितोषिक म्हणून दिले.

जय हिंद विद्यालयातील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात सर्वश्री लंगडे सर अच्युत भालेराव ,जय हिंद विद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक गवळी सर,अरुण जोशी, प्रभाकर जोशी, अतुल शास्त्री, धनंजय देशपांडे तसेच कसबे तडवळे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ .वैशाली सिद्धेश्वरप्रसाद जोशी ,सौ. मनिषा देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती. दंडवते कुटुंबीयांकडून श्रीकृष्ण दंडवते व लक्ष्मीकांत दंडवते हे उपस्थित होते.

 
Top