तुळजापूर - पञकार  संरक्षण कायदा निष्प्रभ ठरत असल्याने पत्रकारांवर हल्‍ले वाढत असल्‍याच्या घटनेचा तुळजापूर तालुका  पञकार संघा तर्फ जाहीर निषेध करीत  निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना गुरुवार दिनांक १७ रोजी  देण्यात आले.

पत्रकारांना संरक्षण मिळावे,यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्‍यानंतरही पत्रकारांवरील हल्‍ले वाढतच आहेत.जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्‍ले होत असल्‍याच्या घटनेचा तुळजापूर  तालुकापञकार संघा तर्फ जाहीर निषेध करीत आहोत. पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर भ्याड करण्यात आला. महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात 46 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरत आहे. अशा आशयाचे  निवेदन देण्यात आले.

उस्मानाबाद जिल्हा मराठी पञकार संघ जिल्हाउपाअध्यक्ष श्रीकांत कदम, तालुकाध्यक्ष प्रदीप अमृतराव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, जेष्ट पत्रकार गोविंद खुरूद,   संजय खुरुद, सतीश फत्तेपुरे, सचिन ताकमोघे, अजित चंदनशिवे  गुरुनाथ बडूरे, सिद्धीक पटेल, अमीर शेख, प्रेस  फोटोग्राफर सतीश पवार अदि उपस्थितीत होते.

 
Top