तुळजापूर (प्रतिनिधी)- कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला जुनी पेन्शन योजना द्यावीच लागेल अशी भूमिका अखिल भारतीय शिक्षकेतर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.बी. सिंग यांनी तुळजापूर मध्ये जाहीर केले.
तुळजापूर येथे येथे आयोजित केलेल्या कृतज्ञता कार्यक्रमांमध्ये शिक्षकेतर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. बी. सिंग उपस्थित कर्मचार्यांना मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा बडे, माधव राऊळ, चिंतामणी लोखंडे, अनिल लबडे, राजू शेखावत, मेघराज पंडित, प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अधीक्षक धनंजय पाटील यांची उपस्थिती होती.
संयोजक धनंजय पाटील, पांडुरंग नागणे, सुमिर कांबळे, दत्तात्रय गडवे, संभाजी बागल ,राजू ढगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक धनंजय पाटील यांनी केले. याप्रसंगी मेघराज पंडित, राजा बडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड यांनी समारोप भाषण केले. जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचार्यांना मिळाली पाहिजे आणि त्या संदर्भात 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे महत्त्वाची बैठक होत आहे. 3 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे देशव्यापी मोर्चाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद कांबळे ,शाहूराज घोडके, डॉ.सतीश महामुनी ,विजय सुरवसे ,अभिजीत निंबाळकर, कृष्णा कोळी, उद्धव नन्नवरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी केले.