तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील योगेश राऊत दिग्दर्शित शहरात चिञीकरण करण्यात आलेल्या ’एपिसोड 13 या भय हिंदी चित्रपटाची मेक्सिको येथे होणार्या 22 व्या मकाब्रो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भारतातून निवड झाली आहे.
येथील योगेश राऊत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट हिंदी भय पट आहे.
योगेश आणि त्याचा भाऊ सुहास या जोडीने हे स्वप्न पाहिलं आणि आपल्या स्वतःच्या निर्मितीच्या जोरावर हे स्वप्न तीस दिवसात तुळजापूर येथील घाटशिळ परिसरातील अर्धवट बांधकाम असलेल्या स्थळी व बार्शी येथे बंगल्याचा बाह्य भागाचे चिञीकरण उपलब्ध जागेत हॉंरर लोकेशन वर शुटींग करुन हा चिञपट पूर्ण केला.
चित्रपटाचा विषय भय पट त्याची मांडणी संपूर्ण वास्तव (रिअॅलिस्टिक) पद्धतीने करायची ही योगेश ची थीम. लेखक उपेंद्र सिधये, आशुतोष मिश्रा आणि योगेश राऊत या त्रयीने ही पटकथा तयार करून समविचारी मित्रांची टिम उभी केली आणि आपल्याच तुळजापूर शहरात चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण केले. दिग्दर्शन, त्याचं लेखन हे सर्वच हॉरर चित्रपटाला वास्तवदर्शी वाटावं इतकं परफेक्ट बनवले. तुळजापूरच्या पंचरंग प्रतिष्ठानचा योगेश हा दिग्दर्शक कलावंत आहे.